भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर
आजची तयारी… उद्याचा पोलीस अधिकारी! जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आज चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर पार पडले. यावेळी उपस्थित राहून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींशी संवाद साधला व त्यांना प्रोत्साहन दिले. या शिबिरात प्रमुख वक्त्यांनी मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे तसेच भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिर्ले, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री. हर्षल चौधरी यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील गुणवंत तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन आणि समान संधी मिळावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. चाळीसगाव तालुक्यातील तरुण-तरुणींनी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्यांच्या सरावासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी दिली. आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील, असा मला विश्वास आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! जय हिंद! 🇮🇳























