भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल !
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल! दगडी बँक म्हणून नावलौकिक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज चाळीसगाव सोसायटी गटातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जळगाव शहराचे आमदार श्री. राजूमामा भोळे, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रोहित निकम, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव महानगराध्यक्ष श्री. दीपक सूर्यवंशी, दूध संघाचे संचालक श्री. मधुकर राणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्या महायुती पॅनलबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती दिली. यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे जलसंपदामंत्री ना. श्री. गिरीशभाऊ महाजन आणि पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील हे घेतील. शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या हितासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील!




