भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीत प्रवास आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीत प्रवास आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटन अधिक मजबूत करण्याला विशेष महत्त्व आहे. याच अनुषंगाने भाजपा प्रदेश संघटनमंत्री मा.श्री. अजय जामवालजी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत आज धुळे जिल्हा कार्यालयात उत्तर महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीत धुळे शहर, धुळे ग्रामीण, मालेगाव, नंदुरबार, जळगाव शहर, जळगाव पूर्व आणि जळगाव पश्चिम या जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मा. अजय जामवालजी यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच संघटन अधिक सक्षम करणे, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेणे, यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहसंघटनमंत्री श्री. सतीशजी धोंड, राज्याचे पणन मंत्री ना. श्री. जयकुमारभाऊ रावल, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, प्रदेश मुख्यालय प्रभारी श्री. रवीजी अनासपुरे, प्रदेश सचिव श्रीमती रोहिणी नायडू यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करत, समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत!














