भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

मतदारसंघाचा विकास

विकासकामे

चाळीसगाव मतदारसंघातील मंजूर, सुरू व पूर्ण झालेली विकासकामे.

१एकूण कामे
₹१.२५ लाखएकूण निधी
१पूर्ण कामे
१गावे
पूर्णगार्डन प्रभाग क्रमांक 1

नमो उद्यान गार्डन

📍 तेजस कोणार्क, धुळे रोड, चाळीसगाव · २०२६
₹१.२५ लाख

नमो उद्यान - चाळीसगावच्या विकासाच्या वाटचालीतील आणखी एक अभिमानाचा क्षण!

भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये धुळे रोड तेजस कोणार्क परिसरात साकारण्यात आलेल्या ‘नमो उद्यानाचा’ लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री हर्षल चौधरी, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. हनुमंत बांगर, गटनेते श्री.प्रशांत कुमावत, श्री. के.बी.दादा साळुंखे, श्री.संजय तात्या पाटील, प्रा.सुनील निकम, श्री.धर्मा आबा वाघ, माजी नगरसेवक श्री.भगवान आबा राजपूत, महिला आयोगाच्या माजी सदस्या सौ. देवयानीताई ठाकरे, शहराध्यक्ष श्री.नितीन पाटील, स्थानिक नगरसेवक व पालिकेचे शिक्षण सभापती श्री. करण पाटील, नगरसेविका सौ. मनिषाताई पाटील, यांच्यासह नगरपरिषद सभापती, नगरसेवक, नगरसेविका, प्रभागातील नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो उद्यानात एक दिवा आशिर्वादाचा प्रज्वलित करून मोदीजींच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यात आली. तदनंतर श्री गणरायाची आरती करण्यात आती करून व विघ्नहर्त्या गणरायाचे आशीर्वाद घेऊन हे सुंदर उद्यान आज चाळीसगावकरांच्या सेवेत समर्पित करण्यात आले.

या उद्यानाबाबतची सर्वात अभिमानाची बाब म्हणजे दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी राज्य शासनाने महाराष्ट्रातील एकूण ३९४ नमो उद्यानांना मंजुरी दिली होती. त्यापैकी अवघ्या एका वर्षाच्या आत काम पूर्ण होऊन लोकार्पण झालेले पहिले नमो उद्यान आपल्या चाळीसगावमध्ये साकारले आहे.

१७ सप्टेंबर २०२५ रोजी शासनाचा निर्णय आणि १७ सप्टेंबर २०२६ रोजी लोकार्पण!

हीच आपल्या द बेस्ट चाळीसगावची ओळख आहे—संकल्प करायचा, कामाला सुरुवात करायची आणि ते वेळेत पूर्ण करून दाखवायचे!
₹१ कोटी २५ लाखांच्या निधीतून साकारलेल्या या उद्यानात लहान मुलांसाठी आधुनिक Play Area, Sitting Area, Green Gym, Walking & Jogging Track, Yoga-Meditation Lawn, Open-Air Amphitheatre, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी Stage, Water Fountain, आकर्षक कमळ शिल्प, श्री गणेश मूर्ती तसेच सुंदर Landscaping आणि वृक्षलागवड अशा विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी आपण सर्वांनी ‘द बेस्ट चाळीसगाव’ घडविण्याचा संकल्प केला होता. आज सुवर्णा स्मृती उद्यान, महाराणा प्रतापसिंह चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संगम सेतू, दयानंद पूल यांसारख्या कामांच्या मालिकेत ‘नमो उद्यान’च्या रूपाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

हे उद्यान केवळ उद्यान नसून चाळीसगावकरांच्या आरोग्य, व्यायाम, योग, बालमनोरंजन, विरंगुळा आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठी सर्वसमावेशक सार्वजनिक जागा म्हणून विकसित करण्यात आले आहे.
राज्यातील उत्कृष्ट नमो उद्यानासाठी असलेल्या ₹५ कोटींच्या पारितोषिकासाठीही आपल्या नमो उद्यानाने सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू. मला विश्वास आहे की चाळीसगावकरांचे सहकार्य आणि नगरपरिषद प्रशासनाची मेहनत यांच्या बळावर आपण हेही यश संपादन करू.