भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव

📅 ११ नोव्हेंबर २०२६ · 📍 एरंडोल · 📸 ८ फोटो

एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सेवाव्रती कृतज्ञता सत्कार सोहळ्यास आज उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी जलसंपदा मंत्री मा.श्री. गिरीशभाऊ महाजन, विधानपरिषदेचे माजी सभापती श्री. अरुणभाऊ गुजराथी, राज्यसभा खासदार तथा विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वलजी निकम, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, स्वागताध्यक्ष आमदार श्री. अमोलदादा पाटील, आमदार श्री. किशोरआप्पा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. संजयजी पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना बापूसाहेबांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाचा, सामाजिक योगदानाचा आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव करण्याची संधी मिळाली. वयाच्या अवघ्या पंचविशीत आमदार होऊन सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या बापूसाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने एरंडोलच्या राजकीय इतिहासात वेगळी ओळख निर्माण केली. १९७८ मध्ये स्व. सोनूसिंग अण्णांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून जनता पक्षाची उमेदवारी दिली आणि नवख्या पक्षातूनही त्यांनी विजय संपादन केला. १९९० च्या पराभवानंतर खचून न जाता पुन्हा संघटन उभे केले आणि १९९५ मध्ये जनता दलाच्या माध्यमातून तब्बल १८ हजार ९८६ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. एरंडोलच्या राजकीय इतिहासातील हा विक्रम त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो. मात्र बापूसाहेबांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी भूमिका विशेष प्रेरणादायी आहेत. राजपूत समाजात विधवा पुनर्विवाहाला विरोध असताना सामाजिक रूढींना छेद देत पद्मालय या तीर्थक्षेत्री समाजातील पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. समाजहितासाठी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवण्याची त्यांची वृत्ती खऱ्या नेतृत्वाचे दर्शन घडवते. अंजनी धरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान तर अनेक पिढ्यांसाठी वरदान ठरणारे आहे. पाणी, शेती आणि ग्रामीण विकास यांचा दूरगामी विचार करून केलेल्या कामाचा ठसा काळाच्या ओघातही कायम राहतो. राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि सहकार अशा विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. बापूसाहेबांचा अमृत महोत्सव हा केवळ त्यांच्या वयाचा टप्पा नसून, संघर्ष, कर्तृत्व, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीचा गौरव आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी ज्येष्ठ नेतृत्वाचा सहवास आणि मार्गदर्शन नव्या पिढीला मिळणे ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या जीवनप्रवासातून नव्या पिढीतील कार्यकर्त्यांनी संघर्षाची प्रेरणा, समाजहिताची दृष्टी आणि लोकसेवेची शिकवण घ्यावी, हीच अपेक्षा! आदरणीय बापूसाहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून यापुढेही समाजाची अशीच सेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! बापूसाहेब, आपल्या अमृत महोत्सवी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव