भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, पशुधन योजना व चारा साक्षरता अभियान प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
शेतकरी बांधवांना पशुपालनातून आर्थिक समृद्धीची नवी संधी! 🐄🌾 📍 मेहुणबारे | चाळीसगाव पशुसंवर्धन विभाग, चाळीसगाव व मातोश्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री बु.प्र.दे. यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित तीन दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, पशुधन योजना व चारा साक्षरता अभियान प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज मेहुणबारे येथील साई संकेत लॉन्स येथे माझ्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून सुरू होत असलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण आणि पशुपालकांसाठी आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी ठरणार आहे. येत्या २६ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरू होणाऱ्या या योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जवळपास १५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याने सर्वांनी आवश्यक प्रशिक्षण घ्यावे, आपला फार्मर आयडी व महा आयडी तयार करून घ्यावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले. आज शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय व पशुपालनाकडे पाहण्याची गरज आहे. योग्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांची जोड मिळाल्यास ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या आणि आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. या दृष्टीने असे प्रशिक्षण शिबिर निश्चितच उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे. यावेळी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रदीप झोड, सहाय्यक आयुक्त श्री. शितल पवार, माजी पंचायत समिती सदस्य श्री. पियुष साळुंखे, मेहुणबारे मंडळ अध्यक्ष प्रदीप देवरे, विकास दूध संघाचे DGM प्रवीण मस्के, किरणजी मांडवडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भट, प्रा. रमेश महाजन, मेहुणबारे सरपंच रवींद्र साळुंखे, पोहरे सरपंच काकासाहेब माळी, दहिवद सरपंच पंकज पवार, आत्माचे ज्ञानेश्वर पवार तसेच मातोश्री बहुउद्देशीय संस्थेचे योगेश पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी समृद्ध झाला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल, या भावनेतून शासनाच्या प्रत्येक लोककल्याणकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ! #पशुधनउद्योजकता #शेतकरी #चाळीसगाव #Chalisgaon #FarmerWelfare























