भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
केमिस्ट भूषण श्री. सुनीलभाऊ भंगाळे यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड..
जळगाव जिल्ह्याचा अभिमान असलेले केमिस्ट भूषण श्री. सुनीलभाऊ भंगाळे यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित भव्य सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय निवडणुकीत संपूर्ण पॅनलमध्ये सर्वाधिक मते मिळवून त्यांनी संपादन केलेला विजय हा त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक कार्याचा आणि नेतृत्वावरील विश्वासाचा गौरव आहे. त्यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक राज्यपातळीवर अधिक उंचावला आहे. याप्रसंगी जलसंपदा मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री श्री. गुलाबरावजी पाटील, चोपडा विधानसभेचे आमदार श्री. चंद्रकांतजी सोनवणे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातील केमिस्ट बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनीलभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील केमिस्ट बांधवांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि संघटनेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच सदिच्छा! सुनीलभाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
















