भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
'श्रीरामकथा ज्ञानगंगा महायज्ञा' च्या समारोपाच्या पूर्वसंध्येला आयोजित महाआरती सोहळा
🚩 श्रीरामकथेच्या भक्तिमय वातावरणात महाआरतीत सहभागी होत घेतले साधू-संतांचे आशीर्वाद! 🚩 चाळीसगाव येथे श्री गंगोत्री बाबा एवं सुनीतीधाम सेवा ट्रस्ट, संकटमोचन हनुमान मंदिर, खडकी बु. बायपास यांच्या वतीने चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित 'श्रीरामकथा ज्ञानगंगा महायज्ञा' च्या समारोपाच्या पूर्वसंध्येला आयोजित महाआरती सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. या श्रीरामकथेचे प्रवक्ते महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज (श्री सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूर तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष, अखिल भारतीय संत समिती) यांच्या अमृतमय वाणीतून गेल्या काही दिवसांपासून भाविकांना प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राचा, आदर्शांचा आणि भक्तीचा अनमोल संदेश मिळत आहे. यावेळी उपस्थित पूज्य साधू-संतांचे आशीर्वाद घेतले तसेच प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत उपस्थित सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. श्रीरामकथेच्या माध्यमातून समाजात भक्ती, संस्कार, सदाचार आणि आध्यात्मिक विचारांची गंगा प्रवाहित होत आहे. अशा धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता निर्माण होण्यासोबतच आपल्या संस्कृती आणि परंपरांचे जतन व संवर्धन होते. या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल श्री गंगोत्री बाबा एवं सुनीतिधाम सेवा ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! जय श्रीराम! 🚩

















