भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
दीपावलीच्या मंगलमय पर्वातील लक्ष्मीपूजन
दीपावलीच्या मंगलमय पर्वातील लक्ष्मीपूजनानिमित्त आज चाळीसगाव येथील माझ्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात श्री लक्ष्मी मातेचे विधिवत पूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनसंपत्तीची आराधना नव्हे, तर आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि सकारात्मकतेचे आगमन व्हावे, तसेच आपल्या हातून सदैव लोकसेवेचे कार्य घडत राहावे, अशी प्रार्थना करण्याचा हा पवित्र दिवस आहे. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभा व परिवारासह कार्यालयात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अंत्योदय जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र योगदान देणारे हे सर्व सहकारी माझ्या परिवाराचाच एक भाग आहेत. श्री लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना आहे की, प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. सर्वांच्या जीवनात आनंदाचे दीप सदैव तेवत राहोत आणि प्रत्येकाचे आयुष्य मंगलमय होवो! आपणांस व आपल्या परिवारास दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!






