भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
चोपडा येथे मराठा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित मराठा प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळा
चोपडा येथे मराठा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित मराठा प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून खेळाडू व आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यसभा खासदार तथा सुप्रसिद्ध सरकारी वकील ॲड. उज्ज्वलजी निकम, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रोहितदादा निकम यांच्यासह प्रमुख प्रायोजक, समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, मराठा स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील एकोपा व एकता अधिक दृढ करण्यासोबतच युवकांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी आणि मैदानी खेळांचे महत्त्व वाढविण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. चोपडा व परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी मराठा प्रीमियर लीग निश्चितच एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळो आणि चोपडा परिसरातून उत्तम क्रिकेटपटू घडोत, हीच सदिच्छा! आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व स्पर्धेतील सर्व संघांना विजयासाठी शुभेच्छा!





